Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

गुहागरमध्ये घरफोडी , अज्ञात चोरट्यांनी 2.31 लाखांचा ऐवज केला लंपास

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात घरफोडीची गंभीर घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
गुहागर खालचापाट येथे राहणारे रविंद्र शरद शिंदे (वय ४९), व्यवसायाने गॅरेज चालक, हे कामानिमित्त कल्याण (जि. ठाणे) येथे गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी पहाटे २ ते ४ या वेळेत त्यांच्या राहत्या घरावर डल्ला मारला.

banner 728x90


चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून दरवाजाचे कुलूप उचकटले व घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेला लॉकर उघडण्यात आला. लॉकरमधून लग्नात वापरलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच WiFi राऊटर असा एकूण २ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.


चोरी गेलेल्या ऐवजात सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (₹५०,०००), २० ग्रॅमचे मणीमंगळसूत्र (₹८०,०००), ८ ग्रॅमच्या अंगठ्या (₹४०,०००), रोख ₹६०,००० आणि ₹१,५०० किंमतीचा WiFi राऊटर यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच रविंद्र शिंदे हे कल्याणहून आपल्या गावी परतले आणि त्यांनी गुहागर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ३१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा १ मे २०२६ रोजी दुपारी ३.०६ वाजता नोंदविण्यात आला.


दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे गुहागर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घराची सुरक्षितता वाढवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *