मराठी युवा उद्योजक रूपेश कोलते यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार

banner 468x60

शिव स्वराज्य फाउंडेशनच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी युवा उद्योजक तथा ‘श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर’चे संचालक रूपेश चंद्रकांत कोलते यांना प्रतिष्ठेचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. भांडुप येथील सह्याद्री विद्या मंदिर सभागृहात १९ जुलै रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात कोकणचे लाडके नेते व माजी आमदार सुभाष बणे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

banner 728x90

व्यवसायातील सातत्य, गुणवत्ता आणि प्रामाणिक कामगिरीच्या जोरावर रूपेश कोलते यांनी गेल्या तीन वर्षांत विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शिफारशीशिवाय केवळ कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाला असून, हा त्यांच्या कारकिर्दीतील १२ वा पुरस्कार ठरला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर रूपेश कोलते यांनी हा सन्मान आपल्या कोकणातील ग्राहक, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांना समर्पित केला. “ग्राहकांचा विश्वास, मित्रांचे सहकार्य आणि सर्वांचे प्रेम यामुळेच हा प्रवास शक्य झाला. हा पुरस्कार माझा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तसेच, शिव स्वराज्य फाउंडेशनने आपल्या कार्याची दखल घेऊन ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आणि आयोजकांचे आभार मानले. भविष्यातही अधिक जोमाने काम करत समाजहित आणि कोकणच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *