Breaking News
चिपळूण : पोफळीतील वीज मंडळाच्या वसाहतीत घरफोडी, पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास चिपळूण : पोफळी नाका येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, एकावर गुन्हा दाखल रत्नागिरी : सरदार पटेल जयंतीनिमित्त रत्नागिरी पोलिसांची ‘एकता दौड’; सायबर सुरक्षेचा दिला संदेश दाभोळ : प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात वणौशी-दुमदेवमधील ग्रामस्थांचे राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन, लवकरच गावाला भेट देण्याचे आश्वासन दापोली : चिखलगावच्या लोकमान्य टिळक विद्यालयाच्या ‘स्किल बॉक्स’ उपक्रमाची शासनस्तरावर दखल, चिखलगावच्या लोकमान्य टिळक विद्यालयाचा गौरव, शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या पुढाकारातून उपक्रमाचा विस्तार

चिपळूण : पोफळीतील वीज मंडळाच्या वसाहतीत घरफोडी, पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील वीज मंडळाच्या वसाहतीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल २ लाख ९६ हजार ५६९ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. २९ ऑक्टोबरच्या रात्री ते ३० ऑक्टोबरच्या सकाळदरम्यान ही घरफोडी घडली. रहिवासी वसाहतीतच चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोफळी येथील एम.एस.ई.बी. कॉलनी, न्यू क्लास-३ मधील सदनिका क्रमांक ९२/२ येथे वैभव वसंत सकपाळ (वय ४१) हे वास्तव्यास आहेत. ते वरिष्ठ तंत्रज्ञ वर्ग-२ म्हणून कार्यरत आहेत. २९ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ वाजल्यापासून ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेपर्यंतच्या कालावधीत त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी व कोयंडा तीक्ष्ण हत्याराने तोडून आत प्रवेश केला.


घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये ३१ ग्रॅम वजनाची सोन्याची लोटस चेन, तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, कानातील सोन्याच्या रिंगा, लक्ष्मी टॉप्स तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख ९६ हजार ५६९ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.


३० ऑक्टोबर रोजी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वैभव सकपाळ यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ नुसार घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वीज मंडळाच्या रहिवासी वसाहतीतच बंद घर फोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *