खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वे ब्रिज परिसरात दुचाकीचा अपघात होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३४ वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 14 LG 5272 क्रमांकाची ॲक्टिव्हा स्कूटर कशेडीच्या दिशेने चिंचवलीकडे जात होती. खवटी रेल्वे ब्रिज परिसरात येताच चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकीचा अपघात होऊन त्यावरील दोघेही जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांच्या वतीने २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सेवेत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेल्या या रुग्णवाहिकेने कशेडी टॅप वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.
या अपघातात वैभव रवींद्र पिंपळकर (वय २७, रा. चिंचवली, सिंगरवाडी) आणि ऋषिकेश सुरेंद्र पिंपळकर (वय २३, रा. चिंचवली, सिंगरवाडी) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, रुग्णवाहिका व पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
या बचावकार्यात नाणीजधामच्या विनामूल्य रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













