खेड : सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे पडले महाग, खेडमध्ये तिघांवर पोलिसांची कारवाई

banner 468x60

खेड शहर व परिसरात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना दारू पिणाऱ्या तिघांवर खेड पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली. २६ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

भोस्ते पुलाजवळील स्मशानभूमी परिसरात दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास पहिली कारवाई करण्यात आली. यावेळी सुशील बबन घाडगे (वय ३५, रा. महात्मा फुले नगर, खेड) हा कोणताही परवाना नसताना दारू पिताना आढळून आला. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई तेजस्विनी उमेश जाधव यांनी फिर्याद दिली. गु.र. नं. २३४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर त्याच परिसरात दुपारी १२:२५ वाजता दुसरी कारवाई करण्यात आली. संदीप राम पवार (वय ४०, रा. महात्मा फुले नगर, खेड) हा विनापरवाना दारू पिताना आढळून आल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई सुरेंद्र बाळकृष्ण कदम यांनी फिर्याद दिली. गुन्ह्याची नोंद २६ ऑगस्ट रोजी दुपारी १:५३ वाजता करण्यात आली.

तिसरी कारवाई आनंद चित्रमंदिर, तीनबत्ती नाका, खेड येथील आवारात सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यावेळी अजय पोपट पवार (वय २९, रा. संगलट, ता. खेड) हा दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारू पिताना आढळून आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश चंद्रकांत धोंडे यांनी फिर्याद दिली असून, गु.र. नं. २३६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याची नोंद रात्री ९:२९ वाजता करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना दारू पिणाऱ्यांविरोधात खेड पोलिसांकडून कारवाई सुरू असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *