चिपळूण तालुक्यात सामाईक जागेच्या वादातून एका ३८ वर्षीय व्यक्तीला वायपरच्या काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना चिपळूण शहरातील रंगोबा साबळे रोडवरील ममता सेल्स कॉर्पोरेशन दुकानात रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. तसेच जागेचा विषय काढल्यास गाडीखाली घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल इकबाल पिलपिले (वय ३८, रा. आयशा मंजिल, रंगोबा साबळे रोड, चिपळूण) आणि नईम निसार पिलपिले (वय ५०, रा. मिरजोळी, ता. चिपळूण) यांच्यात सामाईक जागेवरून वाद होता. हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी चर्चा सुरू असताना वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपीने शिवीगाळ करून वायपरच्या काठीने साहिल यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर, दंडावर, खांद्यावर तसेच डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारहाण केल्याने ते जखमी झाले. याशिवाय, जागेचा विषय पुन्हा काढल्यास कुटुंबातील व्यक्तींना गाडीखाली घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी साहिल इकबाल पिलपिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(३) प्रमाणे ११ ऑक्टोबर रोजी रात्री १०.४५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाईक जागेच्या वादातून घडलेल्या या घटनेप्रकरणी पुढील पोलीस तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













