Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

मंडणगडमध्ये दारुबंदी कायद्याअंतर्गत तीन धडक कारवाया

banner 468x60

मंडणगड पोलिसांनी दारुबंदी कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एका व्यक्तीवर बेकायदेशीर दारूसाठा प्रकरणी तर दोन व्यक्तींवर मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी आढळल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.


कुंबळे गावात एका घराच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या देशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी समीर सत्यवान गायकवाड (वय ३५, रा. कुंबळे, ता. मंडणगड) याच्या ताब्यातून १८० मिली मापाच्या जी.एम. संत्रा ब्रँडच्या ९ प्लास्टिकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत ७२० रुपये असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा क्रमांक ६४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.


त्यानंतर मंडणगड बाजारपेठेतील दरिपकर देशी बारसमोरील सार्वजनिक रस्त्यावर योगेश परशुराम काप (वय ३६, रा. पालघर, ता. मंडणगड) हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा क्रमांक ६७/२०२६ दाखल करण्यात आला.


याच दिवशी रात्री पाट रोड येथील धकुली देशी बारसमोरील सार्वजनिक रस्त्यावर जिगर सूर्यकांत सालेकर (वय ४१, रा. शेनाळे, ता. मंडणगड) हा देखील मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी आढळल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा क्रमांक ६८/२०२६ नोंदविण्यात आला.


या तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *