चिपळूण : कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी, ग्रामस्थांनीमानले आमदार शेखर निकम यांचे आभार

banner 468x60

चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कासारकोळवण गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेत आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून सुमारे ६.५० कोटी रुपयांच्या पुलास मंजुरी मिळाली आहे. गेल्या चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.

banner 728x90

कासारकोळवण गावाच्या दळणवळणासाठी पूल अत्यावश्यक होता. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटत असे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.


या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी विधिमंडळात प्रश्न मांडत तसेच CRF (Central Road Fund) अंतर्गत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अखेर पुलाच्या कामास मंजुरी मिळवली.

या निर्णयाची माहिती मिळताच कासारकोळवण गावातील ग्रामस्थांनी सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन आमदार निकम यांचे अभिनंदन केले व आभार मानले. यावेळी सरपंच सौ. मानसी करंबेळे, उपसरपंच प्रकाश तोरस्कर, पोलीस पाटील महेंद्र करंबेळे, तंटामुक्ती अध्यक्ष नथुराम करंबेळे, राजाराम तोरस्कर (गुरुजी), सुहास मांगले (माजी ग्रामपंचायत सदस्य), उल्हास मांगले, सोन्या मांगले, बाळकृष्ण तोरस्कर, रोशन कदम, प्रशांत करंबेळे, सदानंद करंबेळे (ग्रामपंचायत सदस्य) तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ग्रामस्थांनी भावना व्यक्त करत हा पूल गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *