दापोली तालुक्यातील पाळंदे येथील सॅण्ड कॅस्टल बीच रिसॉर्टमध्ये मुक्कामासाठी आलेल्या ५५ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) घडली. आनंद कार्तिक ढोके (वय ५५, रा. मजरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. रिसॉर्टमधील खोलीत बेडवर आराम करत असताना खाली पडून ते निपचित अवस्थेत आढळल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद ढोके हे दापोली तालुक्यातील पाळंदे येथील सॅण्ड कॅस्टल बीच रिसॉर्टमध्ये मुक्कामाला होते. गुरुवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ते रिसॉर्टमधील खोलीत बेडवर आराम करत होते. यावेळी ते बेडवरून खाली पडल्याने निपचित अवस्थेत आढळून आले.
त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांच्या नोंदीनुसार, मृत्यूची वेळ सकाळी ६ वाजताची नमूद करण्यात आली आहे.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८४/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या घटनेची नोंद ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.४६ वाजता करण्यात आली.
पर्यटनासाठी दापोलीत आलेल्या पर्यटकाचा रिसॉर्टमध्येच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













