Breaking News
दापोलीच्या लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार; महाराष्ट्राचा प्रथमच जागतिक यादीत समावेश, लाडघरसह गुहागर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांचाही गौरव, 15 नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमेश्वर : आजारपणाला कंटाळून कुरधुंडा येथील महिलेची आत्महत्या

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे बावनदी घाटी परिसरातील पऱ्या या दुर्गम ठिकाणी एका ५१ वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुगंधा बाळू खापरे (वय ५१, रा. कुरधुंडा, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पऱ्या परिसरात पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती तत्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्याला देण्यात आली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात उघड झाले की, सुगंधा खापरे या गेल्या काही महिन्यांपासून मूळव्याध आणि कमरेच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. सततच्या शारीरिक वेदना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्या अस्वस्थ होत्या. १० एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजल्यापासून ते ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


आजारपणाच्या असह्य त्रासातून मुक्त होण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.
या प्रकरणाची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुरधुंडा गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


अशा घटना आपल्याला मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन आजारांबाबत जागरूक राहण्याची गरज अधोरेखित करतात. वेळेवर वैद्यकीय उपचार, समुपदेशन आणि कुटुंबीयांचा आधार मिळाल्यास अशा टोकाच्या घटना टाळता येऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *