शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमांमध्ये समाजहिताला प्राधान्य देण्यात आले.

वर्धापन दिनाचे औचित्य साधत कलावतीदेवी वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

यावेळी गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेचा विशेष सन्मान करण्यात आला. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांना गौरवचिन्ह प्रदान केले.

तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुकृपा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष अजय शुक्ला यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.


दरम्यान, अल्पवयातच गिर्यारोहण क्षेत्रात मोठी कामगिरी करणारी रायगड भूषण कु. शर्विका म्हात्रे हिचा विशेष सन्मान करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. अवघ्या ७ व्या वर्षी १७५ हून अधिक गडकिल्ले सर करणाऱ्या शर्विकाने India Book of Records, Asia Book of Records आणि World Book of Records यांसारख्या मानाच्या विक्रम नोंदवहीत स्थान मिळवत १०० पेक्षा अधिक पुरस्कार पटकावले आहेत. तिचा सन्मान दि. ६ मे २०२६ रोजी कुडाळ येथे करण्यात येणार आहे.


सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनदार स्वप्नील गोसावी, सचिव प्रीती गुरव तसेच सदस्य रोहित बेंडल, अविनाश साठले, अभिजीत गोसावी, दिनेश गोसावी आणि प्रांजल खांबल यांनी विशेष मेहनत घेतली. सर्वांच्या सहकार्याने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













