Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन

banner 468x60

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचं निधन झालं असून वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर (Younger Sister Of Legendary Lata Mangeshkar) यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले (Versatile Playback Singer Asha Bhosle) यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Film Industry) दिग्गज संगीतकार आरडी बर्मन (R. D. Burman), ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिलीत.

आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. तसेच, आशाताईंवर उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


प्रकृती अस्वास्थामुळे आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज गायिकेच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अशातच ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *