Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

संगमेश्वरात 12 वर्षीय मुलगा बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रार

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील मयुरबाग लोवले येथील १२ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडील संतोष काशीराम पडये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पडये हे रिक्षाचालक असून पत्नी, आई आणि मुलांसह मयुरबाग लोवले येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा यश संतोष पडये (वय १२ वर्षे) हा दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. मुलगा रागीट स्वभावाचा असून यापूर्वीही तो कोणालाही न सांगता घराबाहेर जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


११ मे २०२६ रोजी यश हा दिवसभर घराबाहेर गेला होता. सायंकाळी घरी परतल्यानंतर वडिलांनी त्याला न सांगता बाहेर गेल्याबद्दल रागावले होते. त्यानंतर तो घराबाहेर अंगणात बसला होता. रात्री झोपण्यासाठी बोलवायला गेल्यावर तो दिसून आला नाही. कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी परिसरात, नातेवाईकांकडे आणि आजूबाजूच्या वाड्यांमध्ये शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.

बेपत्ता मुलाचे वर्णन असे – नाव यश संतोष पडये, वय १२ वर्षे, उंची सुमारे ४ फूट, मजबूत शरीरयष्टी, गव्हाळ वर्ण, गोल चेहरा, काळे डोळे, सरळ नाक व काळे वाढलेले केस. अंगात पांढऱ्या रंगाचा निळ्या पट्ट्यांचा टी-शर्ट, जांभळ्या रंगाची हाफ पॅन्ट व पायात चप्पल होती. त्याची बोलीभाषा मराठी आहे.

या प्रकरणी १३ मे २०२६ रोजी दुपारी ३.०९ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *