संगमेश्वरात 12 वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात १२ वर्षीय मुलगा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून बालकाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगा सोमवार, दिनांक ११ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडला. बराच वेळ उलटल्यानंतरही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी गाव परिसर, शेजारील वाड्या तसेच नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर मुलाच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलाचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांत दिली.

घटनेची गंभीर दखल घेत संगमेश्वर पोलीस ठाणे चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावित हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *