Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

संगमेश्वर : रिक्षा चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला फरार चालक अवघ्या 2 तासांत जेरबंद

banner 468x60

रत्नागिरी–नागपूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाटा येथे घडलेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणातील फरार वाहनचालकाला देवरूख व साखरपा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाफवली येथील रिक्षाचालक विजय पांडुरंग कांबळे (वय ६२) हे देवळे फाटा येथे आपल्या रिक्षासह प्रवाशांची वाट पाहत उभे होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की रिक्षा सुमारे दहा फूट दूर फेकली गेली. या अपघातात कांबळे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच देवरूख व साखरपा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या फुटेजच्या आधारे संशयित स्कॉर्पिओ (एमएच ०९ जीए ६८८६) या वाहनाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत विविध ठिकाणी नाकाबंदी केली.

शोधमोहीम सुरू असताना आंबा घाट परिसरात संबंधित वाहन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचत अवघ्या दोन तासांत चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू असून अपघातास कारणीभूत असलेल्या घटनेबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे.

ही कारवाई देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, चालक कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, सचिन पवार यांच्या पथकाने केली. या कारवाईत पोलीस मित्र सुभाष सुर्वे यांनीही मोलाची मदत केली.

दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *