Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

संगमेश्वर : 80 वर्षीय वृद्धेची आत्महत्या, स्वतःला पेटवून घेत जीवन संपविले

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील भायजेवाडी येथे एका ८० वर्षीय वृद्ध महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वृद्ध महिलेच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

banner 728x90


यमुना भिकू भायजे (वय ८०) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या कुटुंबीयांसोबत भायजेवाडी येथे राहत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता त्या आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या होत्या. घरातील सर्वजण झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्या घराच्या मागील बाजूस असलेल्या अंगणात गेल्या. तेथे त्यांनी माचिसच्या साहाय्याने स्वतःला पेटवून घेतल्याचे समोर आले आहे.


घटना घडल्यानंतर काही वेळाने घराच्या मागील बाजूस आग दिसून आल्याने कुटुंबीयांना संशय आला. १२ मे रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा चंद्रकांत याने घराबाहेर येऊन पाहिले असता आई जळालेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्या वेळी त्यांच्या शरीराची हालचाल सुरू असल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे दाखल केले.


रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने तपासणी केली. मात्र, त्या गंभीर भाजल्याने त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. उपचारादरम्यान पहाटे ५.१५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *