दापोली : सचिन गायकवाड यांची मनसेच्या रत्नागिरी जिल्हासचिवपदी फेरनियुक्ती

banner 468x60

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत सचिन गायकवाड यांची रत्नागिरी जिल्हा सचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल दापोली तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सचिन गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

banner 728x90

सचिन गायकवाड यांनी यापूर्वीही रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक वाढ करण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यपद्धतीचा पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.

नव्या जबाबदारीत रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची संघटना अधिक सक्षम करणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, युवकांना संघटनेत सक्रिय करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे, ही प्रमुख आव्हाने त्यांच्यासमोर असणार आहेत. आगामी काळात या माध्यमातून जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्यासाठी सचिन गायकवाड प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *