रत्नागिरी : एटीएम केंद्रात मदत करण्याच्या बहाण्याने एका महिलेचे एटीएम कार्ड बदलून तिच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढण्याबरोबरच कार्डद्वारे ७ हजार ७०० रुपयांची खरेदी करून एकूण ५७ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात सुरतमधील एका व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० जुलै २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास विश्वनगर येथील इंद्रधन अपार्टमेंटमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात घडली. याप्रकरणी स्मृतिका संजय पाटोळे (वय ५८, रा. उद्यमनगर रोड, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी एटीएममधून व्यवहार करण्यासाठी गेल्या असता धिरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. सदगुरू अपार्टमेंट, सुरत सिटी, गुजरात) याने मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर त्याऐवजी दुसरे कार्ड देऊन फिर्यादी यांची दिशाभूल केली.
यानंतर आरोपीने फिर्यादींच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यातून एटीएम कार्डच्या माध्यमातून ५० हजार रुपये रोख काढले. तसेच त्याच कार्डचा वापर करून प्रियांका वाईन मार्ट येथे ७ हजार ७०० रुपयांचे पेमेंट केले. अशा प्रकारे आरोपीने एकूण ५७ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(२) व ३१८(४) अंतर्गत आरोपी धिरजकुमार मोहनलाल पांचाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













