Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणास अटक

banner 468x60

रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील रस्त्याने चालत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या संशयित तरुणास ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

विकास विजय माने (वय २५)असे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) रात्री नऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास खेडशी परिसरात चालत जात असताना संशयिताने तिच्याशी गैरवर्तन केले.

तिने आरडा-ओरडा केला. त्यानंतर संशयिताने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्या संशयित तरुणास अटक केली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम ७५(१) (आय) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनयम २०१२ (पॉस्को) चे कलम ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयिताची न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *