Breaking News
चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद

रत्नागिरी : उक्षी घाटातील फार्म हाऊसवर 18-20 जणांच्या टोळीकडून चोरी

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी घाटातील फार्म हाऊसवर चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. 18-20 जणांचे टोळके चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

ही घटना शनिवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेच्या उक्षी घाटातील फार्महाऊवर चार चाकीतून आलेल्या 18 ते 20 जणांनी चाल केली.

चोरीच्या उद्देशाने हे चोरटे परिसरात फिरत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत चार चाकीतून उतरताना तसेच तोंडाला मास्क बांधलेले असे ते चोरटे फार्म हाऊस वरील नारळाच्या झाडांवर चढताना दिसत आहेत.तसेच या परिसरातील नारळ त्यांनी चोरून नेले.

चोरट्यांनी शिडीच्या साहाय्याने झाडावर चढून नारळ काढले आणि ते शिडी नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत.


रविवारी सकाळी या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कामगार साफसफाई करत असताना ही घटना निदर्शनास आली. त्याने आपल्या मालकालाही हकीकत सांगितली. त्यानुसार मालकाने सीसीटीव्ही फुटेज चेक केली असता पहाटेच्या सुमारास चार चाकी वाहनातून चोरटे उतरत असून 18 ते 20 चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आले आहेत.

नारळाच्या झाडावर चढून नारळ काढताना दिसत आहेत तर काही जणांनी तोंडावर मास्क बांधलेले दिसत आहे.
या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी यांच्याकडे दिली असून सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *