रत्नागिरी : तरुणीची छेड काढल्याच्या रागातून मारहाण, 9 संशयितांवर गुन्हा

banner 468x60

तरुणीची छेड काढल्याच्या रागातून रत्नागिरीतीलजाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांना सोमवारी मारहाण करण्यात आली होती. ही घटना सिद्धाई फुड्स काँग्रेस भवन येथे घडली. मारहाणीत जखमी झालेल्या गर्दे यांच्याकडून शहर पोलिसांत मारहाण करणा-या संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.


त्यानुसार पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. महेश गर्दै हे काँग्रेस भवन येथे सिद्धाई फुड्स नावाचे दुकान चालवतात. 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास याठिकाणी 9 संशयितांनी प्रवेश केला.

तरुणीची छेड काढल्याच्या रागातून या संशयितांनी गर्दे यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करत हाताच्या थापटाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत महेश गर्दै हे बेशुद्ध पडले. याठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी तातडीने महेश यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले. तसेच पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.


घटनास्थळावरुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार, त्या पदाधिकाऱ्याने कामाला असलेल्या मुलीला दोन महिन्याचा पगार दिला नव्हता. तसेच तिच्याशी गैरवर्तन केल्याचे बोलले जाते. याबाबत तरुणीने आपल्या घरी सांगितले. सोमवारी दुपारी नातेवाईकांनी येऊन त्या पदाधिकाऱ्याला चोप दिला. या मारहाणीत पदाधिकारी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला.

त्याला तत्काळ त्याला उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अधिक उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्यापही तो पदाधिकारी बेशुद्ध आहे.

या प्रकरणी पीडित तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. महेश याच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम, 189(2),190,191(2),125(अ),115(2),332(क),324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *