Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Ratnagiri News Chiplun – चिपळुण : तरूणीचा खून? सवतसडा धबधब्याजवळ आढळला मृतदेह

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील पेढेनजीक असलेल्या सवतसडा धबधब्याजवळ एका तरूणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे.

धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याने निर्माण झालेल्या खड्‌ड्यात हा मृतदेह अक्षरश: कोंबलेल्या अवस्थेत दिसून आला. यामुळे हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

सोमवारी (दि.४) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास परिसरातील एक कामगार धबधब्यावर पाणी आणायला गेला असता त्याला धबधब्याच्या खडड्यात उलट्या अवस्थेत पडलेला तरूणीचा मृतदेह आढळून आला.

तत्काळ त्याने ही माहिती पेढे येथील ग्रामस्थांना दिली. यानंतर येथील ग्रामस्थांनी पोलिस पाटील यांना माहिती देऊन तत्काळ चिपळूण पोलिसांना कळविण्यात आले.

सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास चिपळूण पोलिस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. सवतसडा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी धबधबा ओसंडून वाहू लागल्यानंतर महामार्गावरून जाणारे तसेच परिसरातील अनेक पर्यटक या धबधब्याखाली मनसोक्त भिजण्यास येत असतात.

याच धबधब्याच्या ठिकाणी हा तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने पेढे, परशुराम परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Ratnagiri News दरम्यान उशिरापर्यंत या तरूणीची ओळख पटलेली नाही. या तरूणीच्या हाता-पायावर जखमा असून घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.

धबधब्याचे पाणी कोसळणाऱ्या खड्‌ड्यात या तरूणीला अक्षरश: कोंबून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तरूणीचे पाय वरच्या स्थितीत असल्याने ती संबंधित कामगाराला दिसून आली. या प्रकरणी चिपळूण पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *