Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरात ३२ वर्षीय विवाहितेने कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे.


मृत महिलेचे नाव मेनका युवराज चव्हाण असे आहे. त्या पती युवराज चव्हाण यांच्यासह साळवी स्टॉप परिसरात वास्तव्यास होत्या.


मिळालेल्या माहितीनुसार, १२ एप्रिलच्या रात्री पती उशिरा घरी परतल्याने पती-पत्नीमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता. या वादानंतर मानसिक तणावातून मेनका चव्हाण यांनी घरात ठेवलेले उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले.
घटनेनंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्याचे लक्षात येताच पती युवराज चव्हाण यांनी त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असतानाच १२ एप्रिल रोजी सकाळी ७.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात १६ एप्रिल रोजी आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत ही नोंद घेण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात असून, आत्महत्येमागील नेमकी कारणमीमांसा आणि परिस्थितीचा सखोल तपास केला जात आहे.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एका क्षणिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *