रायगड : अतिमुसळधार पावसाचा इशारा, रायगडमधील 7 तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

banner 468x60

हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यांतील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आज (२ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, पालकांनी आणि नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, नदी-नाले, सखल भाग आणि डोंगराळ परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *