Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी, इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचं अपक्रम, शिबिर उत्साहात संपन्न

banner 468x60

शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २६ जुलै २०२६ रोजी खेड येथील एल. पी. इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोषांचे लवकर निदान करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल, खेडच्या संपूर्ण वैद्यकीय टीमचे विशेष आभार मानले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

याप्रसंगी “दृष्टी हीच समृद्धी – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा सतत प्रयत्न” हा संदेश देत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलने भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *