रत्नागिरी : सोमेश्वर येथे तळ्यात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील तळ्यात पोहायला गेलेल्या १७ वर्षीय आदेश दत्ताराम घडशी या युवकाचा सोमदेव तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली.


देवरुख येथील रहिवासी व स्थानिक महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला आदेश नुकताच बारावी परीक्षा पास झाला होता. परीक्षेनंतर सुट्टीच्या काळात तो रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथे आपल्या मित्रांसोबत गेला होता.

तिथे सोमदेव मंदिराजवळील अंदाजे १५ ते १६ फूट खोल तळ्यात उडी मारल्यानंतर तो पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे गटागळ्या खाऊन बुडाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून आदेशला पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा श्वास थांबलेला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर आदेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.


या घटनेमुळे देवरुख परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नुकताच आयुष्याला सुरुवात करणाऱ्या युवकाचा असं दुर्दैवी निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *