Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : पालीतील लॉजवर पोलिसांचा छापा, अनैतिक व्यापारप्रकरणी एक महिला ताब्यात

banner 468x60

अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईला आणखी एक यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे पाली येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’वर छापा टाकून अनैतिक व्यापारप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाइल आणि इतर साहित्य असा एकूण ७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना ११ ऑगस्ट रोजी पाली येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’मध्ये महिलांना आणून ग्राहक उपलब्ध करून देत अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, ग्रामीण पोलिस ठाणे आणि महिला कक्षातील अधिकारी-अंमलदारांनी पंच व बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. माहितीची खात्री होताच लॉजवर छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान लॉजमधील एका खोलीत नेपाळमधील दयलेक येथील मूळ रहिवासी असलेली ३९ वर्षीय महिला आढळून आली. पोलिसांच्या चौकशीत तिच्याकडून अन्य महिलेमार्फत अनैतिक व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच बोगस ग्राहकाकडून घेण्यात आलेली २ हजार रुपयांची रोख रक्कम पंचांसमक्ष तिच्याकडून जप्त करण्यात आली. या कारवाईत पाच सीलबंद निरोध पाकिटे, २ हजार रुपये रोख आणि सुमारे ५ हजार रुपये किमतीचा Vivo कंपनीचा मोबाइल असा एकूण ७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिसांच्या तपासात संबंधित महिला आर्थिक लाभासाठी बाहेरील शहरांतून महिलांना रत्नागिरीत बोलावून लॉजमध्ये ग्राहक उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर आल्याचे सांगण्यात आले. या व्यवहारातून मिळणाऱ्या रकमेतून संबंधित महिलांना ठराविक रक्कम दिली जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, सहायक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, महिला पोलीस कर्मचारी स्वाती राणे, छाया चौधरी तसेच विजय आंबेकर, गणेश सावंत आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *