रत्नागिरी तालुक्यातील पाली येथून रत्नागिरीच्या दिशेने येत असताना दुचाकीला मागून भरधाव मोटारीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी (२८ सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास पाली येथील सबुरी हॉटेल लॉजसमोरील रस्त्यावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर गुणाजी बारे (वय ५२, रा. पाली-बाजारपेठ, एसटी स्टॅण्डजवळ, रत्नागिरी) हे पत्नी मिनल मनोहर बारे यांच्यासोबत दुचाकी क्रमांक एमएच-०८-एसी-४९७३ वरून वळके येथे कार्यासाठी जात होते. पाली येथील सबुरी हॉटेल लॉजसमोरून पेट्रोल पंपाच्या दिशेने वळत असताना मागून आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर मनोहर बारे आणि त्यांच्या पत्नी मिनल हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात मनोहर बारे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी मिनल बारे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातातील मोटार एमएच-१४-एलयू-९७८७ ही सुशांत रमेश नेर्लेकर (वय ३८, रा. कोल्हापूर) चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मोटारचालक सुशांत नेर्लेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, तसेच वाहनाचा वेग आणि चालकाची निष्काळजीपणा याबाबत ग्रामीण पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













