रत्नागिरी : नाचणे ग्रामपंचायत जिल्ह्यात ‘नंबर वन’

banner 468x60

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२४-२५ चा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील नाचणे अभियाना अंतर्गत एकूण सहा ग्रामपंचायतींना रोख रकमेचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

ग्रामपंचायत प्रथम आली आहे. या अभियानातंर्गत जिल्हापरिषद गटामधील प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीमधून सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात आली. यामधून हे क्रमांक संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान काढण्यात आले.

प्रथम क्रमाक नाचणे (रत्नागिरी), द्वितीय खरवते (राजापूर), तृतीय हातीव (संगमेश्वर) यांना अनुक्रमे ६ लाख, ४ लाख, ३ लाख अशी बक्षीस जाहीर झाली आहेत.

त्याचबरोबर वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी व्यवस्थापन) आंबव, संगमेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) विरसई, दापोली, आबासाहेब खेडेकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) खामशेत, गुहागर यांना जाहीर झाला. या सर्वांना ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *