Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : मध्यरात्री खेडेकर यांच्या घराला भीषण आग

banner 468x60

रत्नागिरीमधील मांडवी रोड येथील भूतेनाका येथे असलेल्या खेडेकर बंधूंच्या घराला मध्यरात्री आग लागली आणि काही वेळातच ही आग भडकली. मात्र यावेळी घरात कोणीही नसल्याची माहिती आहे.

हे घर सुनिल खेडेकर यांचे आहे मात्र जेव्हा आग लागली तेव्हा ते आणि त्यांचे कुटुंबिय कोल्हापूरला गेल्याचे सांगण्यात आले. घरातील फ्रिज सुरु होता. फ्रीजच्या वायरला शॉर्ट सर्किट होवून घरात आग सर्वत्र पसरली.

घर दुमजली असल्याने आग भडकली. शेजारच्या नागरिकांनी नगरपालिकेला कळवताच नगरपालिकेचा बंब व एमआयडीसीचा बंब येऊन मध्यरात्री शिकस्त करुन आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.

परंतु घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाली. या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *