Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

banner 468x60

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवत तब्बल दीड वर्ष प्रौढाने वारंवार लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी संशयित प्रौढाला न्यायालयाने 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गोविंद अनंत घवाळी (वय 45, रा. भारती शिपयार्डजवळ मिऱ्या बंदर, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित गोविंद घवाळी याने पीडितेशी ओळख करून तिचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने ऑगस्ट 2023 ते 6 डिसेंबर 2024 या कालावधीत वारंवार जबरदस्तीने तिच्याशी शहरातील मांडवी, टीआरपी, गोडबोले स्टॉप, पंधरा माड, मिऱ्या बंदर, परटवणे या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याने पीडित तरुणीला वारंवार शिवीगाळ व मारहाणही केली आहे. याबाबत पीडितेने सोमवार 9 डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी गोविंदला रात्री 10.43 वा. सुमारास अटक केली.

मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *