Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

गणपतीपुळे : वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून केला खून

banner 468x60

घरगुती भांडणाच्या रागातून वडिलांच्या डाेक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून खून केल्याची खळबळजनक घटना निवेंडी- वरची समतानगर येथे घडली.

सुरेश नावजी कदम (५८) असे मृत वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा राजेश सुरेश कदम (३८) याला जयगड पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी (१२ ऑक्टाेबर) रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.

निवेंडी वरची समतानगर येथे सुरेश कदम हे आपला मुलगा राजेश व मुलगी सुषमा असे एकत्रित राहत होते. घरगुती कारणावरून गुरुवारी रात्री सुरेश कदम व मुलगा राजेश यांच्यात वाद झाला.

हा वाद विकोपाला जाऊन राजेश याने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. त्यात ते जागीच कोसळले. ते उठत नसल्याचे पाहून राजेशने आपला चुलत भाऊ विनेश कदम याला घरी बोलावून आणले. विनेश कदम यांनी पाहिले असता सुरेश कदम हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले.

याविषयीची विनेश कदम यांनी तत्काळ निवेंडीचे पोलिस पाटील दिवाकर कदम यांना माहिती दिली. पोलिस पाटील कदम यांनी तत्काळ सरकारी रुग्णवाहिका बोलावून सुरेश कदम यांना खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिसांनी राजेश कदम याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *