Breaking News
दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार

रत्नागिरी : गौणखनिज तक्रारीबाबत आता 7 दिवसात होणार कारवाई

banner 468x60

छुप्या आशिर्वादाने ठिकठिकाणी वाळू, खडी, माती आदी गौणखनिजांचे उत्खनन सुरू असते. याविषयी जागरूक नागरिकांनी तहसीलदार किंवा जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली तरी त्याची दाद घेतली जात नाही, हे लक्षात घेवून राज्य सरकारने तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी कालमर्यादा निश्‍चित केली आहे.

आता तक्रार दाखल झाल्यापासून ७ दिवसांत प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करावी असा शासन निर्णय जारी केला आहे.राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने शुक्रवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.

सामान्य नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधींकडून क्षेत्रीय अधिकार्यांना अवैध गौणखजिन उत्खनन व वाहतूक या विषयाबाबत प्राप्त झालेली निवेदने लक्षात घेवून ७ दिवसात पाहणी व चौकशी करावी. महसूल संहितेतील तरतुदीप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करावी. तक्रारदारांना त्या बाबतची माहिती लेखी स्वरूपात कळवावी.

लोकप्रतिनिधींच्या तक्रारअर्जावर केलेल्या कार्यवाहीबाबत तत्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींना कळविण्यात यावे. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही न झाल्यास सक्षम अधिकार्यांना जबाबदार धरून कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा या शासन निर्णयात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *