Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : नाचणे-सावंतनगरमध्ये भरदिवसा घरफोडी 4 लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास

banner 468x60

रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे-सावंतनगर परिसरात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ४ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी (९ जून) सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी हेमंतकुमार महेंद्र चोप्रा (५३, रा. आसमंत, सावंतनगर-नाचणे) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चोप्रा हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कडीसह उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी व लाकडी कपाटे फोडून त्यामध्ये ठेवलेले मौल्यवान दागिने आणि वस्तू चोरी करून नेल्या.


चोरीस गेलेल्या ऐवजात ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ११.७८ ग्रॅमचे मंगळसूत्र, प्रत्येकी २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमची सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, दोन सोन्याची नाणी, सोन्याचे पेंडंट, १० हजार रुपये किमतीची मोत्यांची माळ, २ हजार रुपये किमतीची कृत्रिम मोत्यांची माळ तसेच विविध चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत ४ लाख १६ हजार ७०० रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन त्याची तपासणी सुरू केली आहे. चोरी करणाऱ्या संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके सक्रिय करण्यात आली आहेत.

दरम्यान, रत्नागिरी शहर आणि परिसरात अलीकडच्या काळात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः भरदिवसा बंद घरे लक्ष्य केली जात असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घरफोडीचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *