Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : कारवांचीवाडी फाट्यावर भरधाव कारची धडक, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहरालगतच्या कारवांचीवाडी फाट्यावर १ मे रोजी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. प्रभाकर शांताराम साळवी (वय ६६, रा. रॉयल अपार्टमेंट, श्रीनगर-खेडशी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साळवी हे कारवांचीवाडी फाटा येथे रस्ता ओलांडत असताना रत्नागिरी-हातखंबा मार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या (एमएच ०८ बीई ३३७९) क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. अभिजीत प्रभाकर मोहीते (रा. एमआयडीसी मिरजोळे) हा चालक वाहन चालवत होता. धडकेची तीव्रता मोठी असल्याने साळवी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर स्थानिकांनी तत्परता दाखवत साळवी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी रुपेश सुधाकर सुर्वे (वय ३५, रा. खेडशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित चालकाविरोधात भारतीय दंड संहिता २०२३ मधील कलम १०६ (९), १२५ (अ), २२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

कारवांचीवाडी येथील फाटा हा दिवसेंदिवस अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळख निर्माण करत आहे. या ठिकाणी दुतर्फा येणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड असल्याने वाहतूक नियंत्रणाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. महामार्गासारख्या गतीने धावणारी वाहने आणि त्यात अचानक येणारी स्थानिक वाहतूक यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनत आहे. याशिवाय, ग्रामीण पोलिस ठाण्याकडून येणाऱ्या रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते.

या दोन दिशांच्या वाहतुकीचा संगम होत असल्याने या ठिकाणी कायमच गर्दीचे चित्र पाहायला मिळते. परिणामी, रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा फाटा अक्षरशः जीवघेणा ठरत असून, प्रत्येक वेळी रस्ता पार करताना भीतीचे वातावरण निर्माण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *