Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : आजारपणाला कंटाळून प्रौढाची गळफास लावून आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे एका ५६ वर्षीय प्रौढाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. अशोक रामचंद्र मोरे (वय ५६, मूळ रा. पनवेल, रायगड, सध्या रा. गोळप, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

banner 728x90

ही घटना ५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी अशोक मोरे हे घरात एकटेच होते. याच संधीचा फायदा घेत त्यांनी आजारपणाला कंटाळून घरातील बेडशीट फाडली आणि सिलिंग फॅनला गळफास लावून घेतला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी घरात परतली असता त्यांना अशोक मोरे हे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *