Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : अणस्कुरा घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून एकाचा मृत्यू

banner 468x60

राजापूर तालुक्यातील पाचल अणस्कुरा मार्गावर अणस्कुरा घाटात इरटिका कार सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक अमित यादव यांसह पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर येथून पाचल येथे येत असताना हा अपघात झाला. याबाबत मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार, कौस्तुभ विजय कुरूप हा लांजा येथून ३ जून रोजी कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने येत होता.

रात्री त्याच्या आईने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईने लांजा पोलीस ठाण्यात कौस्तुभ बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.
अणूस्कुरा घाटातील दाट धुक्यामुळे कौस्तुभला रस्त्याचा अंदाज आला नसावा आणि त्यामुळे त्याची कार थेट ४०० फूट खोल दरीत कोसळली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातात कौस्तुभ कारमधून बाहेर फेकला गेला. तो दगडांवर आदळत सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा.


हा अपघात आज सकाळी उघडकीस आला. काल, ३ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अणूस्कुरा घाटात जयेश फटकारे या तरुणाला रस्त्यावर एका गाडीचे इंजिन पडलेले दिसले होते. त्यावेळी घाटात धुकं असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, आज बुधवारी सकाळी त्याला तेच इंजिन आणि गाडीचे इतर पार्ट पुन्हा दिसले. यानंतर त्याने तात्काळ अणूस्कुरा घाटातील चेकपोस्टवरील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन वीर यांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी

याची गंभीर दखल घेऊन अणूस्कुरा घाटात तपास सुरू केला. यावेळी त्यांना रस्त्याच्या सुमारे दीडशे फूट खाली कौस्तुभ विजय कुरूप याचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला, तर गाडीचे पार्ट सुमारे ४०० फूट खोलवर विखुरलेले दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *