रत्नागिरी शहरात पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत दोन तरुणांना ४४ ग्रॅम गांजासह अटक केली. ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी पहाटे पेठकिल्ला ते रहाटाघर ८० फूटी हायवेवर एमएसईबी कार्यालयासमोरील रस्त्यावर करण्यात आली.
पोलीस पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तैमर अब्दुल लतीफ पावसकर (वय ३४, रा. ८० फूटी हायवे, एमएसईबी कार्यालयामागे, रत्नागिरी, मूळ रा. कातळी, राजापूर) आणि अश्विन अमित जोईल (वय १९, रा. मांडवी, भैरी मंदिराजवळ, रत्नागिरी) हे साकी अॅक्सेस १२५ दुचाकीवरून जाताना आढळून आले.
तपासणीदरम्यान त्यांच्याकडे ४४ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण १ लाख १ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १,१०० रुपये किमतीचा ४४ ग्रॅम गांजा, दोन्ही आरोपींचे प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि ८० हजार रुपये किमतीची एमएच ०८-बीएच-७३९६ क्रमांकाची अॅक्सेस १२५ दुचाकीचा समावेश आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६५/२०२६ नोंद करण्यात आला असून, एनडीपीएस अॅक्ट १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) आणि २९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.५८ वाजता अटक करण्यात आली.
ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखेतील पोहेकॉ योगेश जयवंत तेंडलकर यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













