Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूर : तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

राजापूर शहरातील वरचीपेठ येथे शुक्रवारी सकाळी एका दुर्दैवी घटनेत तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक प्रमोद पांडुरंग मांजरेकर (वय ५१) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वरचीपेठ परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद मांजरेकर हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपला ट्रॅक्टर घेऊन कामासाठी निघाले होते. त्यांचे घर वरचीपेठ येथे असून घराला लागूनच तीव्र उताराचा रस्ता आहे. याच ठिकाणी अचानक प्रमोद यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात प्रमोद ट्रॅक्टरच्या पुढच्या भागाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


घटनेनंतर मांजरेकर कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी ट्रॅक्टर उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.अखेरीस जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करून प्रमोद यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


प्रमोद यांच्या अपघाती निधनाची बातमी शहरात पसरताच राजापूर ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. प्रमोद हे एक प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि भाऊ असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या निधनाने मांजरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.प्रमोद यांनी काही काळ राजापूर नगर परिषदेत कंत्राटी चालक म्हणूनही काम केले होते आणि त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *