Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूरात 32 वर्षीय महिलेची आत्महत्या, आकस्मिक मृत्यूची नोंद

banner 468x60

राजापूर तालुक्यातील सागवे बुरुंबेवाडी येथे ३२ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आरती संदीप गुरव (वय ३२, रा. उपळे गुरववाडी, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरती गुरव या काही दिवसांपासून डोक्याच्या आजाराने त्रस्त होत्या. रविवारी सकाळी त्या बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांना वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासात दीर्घकाळच्या आजारामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची नोंद २ ऑगस्ट रोजी सायंकाळी करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी आत्महत्येचे विचार, तीव्र निराशा किंवा मानसिक तणावाचा सामना करत असाल, तर विश्वासू व्यक्तीशी बोलणे आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा स्थानिक आपत्कालीन मदतसेवेशी त्वरित संपर्क साधणे उपयुक्त ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *