Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूरात 29 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील केळवली-रोहीदासवाडी येथे २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. राजेश दिपक मोरवस्कर (वय २९, रा. केळवली-रोहीदासवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते २८ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.१५ वाजण्याच्या दरम्यान घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये घडली. राजेश मोरवस्कर यांनी शेडमधील आतील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे पाठविण्यात आला.

या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४८/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मयत हा दारूच्या अतिव्यसनाधीन असल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

टीप: आत्महत्येची कारणे अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत निश्चित मानता येत नाहीत. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *