Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापुर : महिलेची सुमारे 7 लाखांची ऑनलाईन फसवणूक

banner 468x60

राजापूर तालुक्यातील तेरवण येथील एका महिलेची एका महिलेसह अरविंद सिन्हा नामक एका अज्ञात व्यक्तीने कमी वेळेत जादा परताव्याचे आमिष दाखवून 5 लाख 85 हजार 307 या रकमेची ऑनलाईन फसवणूक केली. याबाबतची फिर्याद संबंधित महिलेने राजापूर पोलिसांत दिली आहे.

दि. 24 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. तक्रारीनुसार फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर एका अज्ञात महिलेने बेटिंग अ‍ॅपवर गुंतवणूक केल्यास कमी वेळेत जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडून फिर्यादी यांची 4 लाख 87 हाजार 300 रुपयांची फसवणूक केली आहे.

तसेच अरविंद सिन्हा याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी येळात जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडून फिर्यादी यांची 97 हजार 998 रुपयांची फसवणूक केलेली आहे.

दोघांनी मिळून किर्यादी यांची एकूण 5लाख 85 हजार 307 इतक्या रकमेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अरविंद सिन्हा व अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *