Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

राजापुर : कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी

banner 468x60

राजापूर तालुक्यातील कारवली अर्जुना माध्यमिक विद्यालयासमोर टाटा इंडिका व्हिस्टा कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 3 जानेवारी रोजी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात दुचाकीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. स्वामी दिनेश वाझे (23, कारवली, राजापूर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी वाझे हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एम एम 08- ए झेड- 4897) घेऊन कारवली ते पाचल असा चालला होता. यावेळी कारवली अर्जुना माध्यमिक विद्यालयासमोर टाटा इंडिका व्हिस्टा कार (एम एच 09 सी एम 3597 ) गाडीने स्वामीच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

या अपघातात स्वामी हा रस्त्यावर पडून त्याच्या डोक्याला, पाहायला दुखापती झाल्या. तसेच गाडीचे दर्शनी भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

चारचाकी चालक निलेश गणपत शिंदे (30, राजाराम पुरी कोल्हापूर) याने आपल्या ताब्यातील चारचाकी बेदरकारपणे चालवून स्वामी यांच्या दुखापतीस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल अनंत तीवरेकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *