राजापूरच्या बारसूतील 27 वर्षीय तरुण बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

banner 468x60

राजापूर तालुक्यातील बारसू खालचीवाडी येथील २७ वर्षीय शुभम रवींद्र शिर्के हा तरुण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. १४ नोव्हेंबर २०२६ पासून त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नसल्याने कुटुंबीयांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून, पोलिसांकडूनही त्याचा शोध सुरू आहे.


बेपत्ता तरुणाचे नाव शुभम रवींद्र शिर्के (वय २७, रा. बारसू खालचीवाडी, ता. राजापूर) असे आहे. त्याची उंची अंदाजे ५ फूट ८ इंच असून, बांधा सडपातळ, रंग गोरा आणि चेहरा लांबट आहे. त्याचे केस काळे व छोटे आहेत. बेपत्ता झाला त्यावेळी त्याने मोती रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट परिधान केला होता.
शुभम शिर्के यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा दिलेल्या वर्णनाशी साधर्म्य असलेला तरुण आढळून आल्यास तातडीने राजापूर पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


यासाठी पोलीस निरीक्षक अमित यादव (८५९१३९६७१०) किंवा पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे (७३५००२८४८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे राजापूर पोलिसांनी कळवले आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.