चिपळूण तालुक्यातील कळवंडे माडवाडी येथे २३ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या टेरेसवर आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. प्रशांत प्रदीप उदंग (वय २३, व्यवसाय गवंडी मजुरी, रा. कळवंडे माडवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. ऐन तारुण्यात घडलेल्या या घटनेमुळे कळवंडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत उदंग हा गवंडी मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर गेला होता. यावेळी टेरेसवर कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या दोरीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद करून आवश्यक कार्यवाही सुरू केली.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी नोंद करण्यात आली आहे.
प्रशांत उदंग याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











