Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर, रत्नागिरी आणि गुहागरमध्ये सर्वाधिक 75.88 मिमी पर्जन्यमान

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात १० जून २०२६ रोजी विविध तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात आज एकूण 228.27 मिमी पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान 25.36 मिमी इतकी राहिली.

banner 728x90

आजच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 75.88 मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यापाठोपाठ गुहागरमध्ये 60.00 मिमी आणि संगमेश्वरमध्ये 30.08 मिमी पाऊस झाला. दापोली आणि चिपळूण तालुक्यांमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

तालुकानिहाय पर्जन्यमान (मिमीमध्ये)

मंडणगड – 5.00
दापोली – 13.42
खेड – 4.75
चिपळूण – 12.77
गुहागर – 60.00
संगमेश्वर – 30.08
रत्नागिरी – 75.88
लांजा – 16.00
राजापूर – 10.37

हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच सखल भागांमध्ये पाणी साचणे, रस्त्यांवर घसरडी परिस्थिती निर्माण होणे आणि दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *