Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : चोरीच्या उद्देशाने बाजारात फिरणाऱ्या संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात

banner 468x60

दापोली शहरातील मच्छीमार्केट येथे चोरीच्या उद्देशाने बसलेल्या शाकिब नासिर मुल्ला या 24 वर्षीय तरुणाला दापोली पोलिसांनी अटक केल्याची घटना शुक्रवार रात्री 1 वाजता घडली.


दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीब मुल्ला (रा.पांनदी दाभिळ) हा शुक्रवार 6 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजता मच्छीमार्केट दापोली येथे दापोली चिकन सेंटर दुकानाच्या आडोशाला अंधारात लपून बसलेला आढळला.

हा तरुण चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या बसलेला दिसला. त्याच्या हातामध्ये स्टीलचा रॉडही आढळला. दापोली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (अ) प्रमाणे त्याला अटक केली.

या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *