Breaking News
दापोलीकरांसाठी खुशखबर! ताम्हिणी मार्गे पुण्याला जाण्यासाठी बससेवा सुरूदापोली आगारातून चार फेऱ्या; विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा कुवेतमधील भारतीय दूतावासात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात, भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त सहभाग; तिरंग्याला मानवंदना देत देशप्रेमाचा जागर गुहागर : उपचार सुरू असताना 42 वर्षीय व्यक्तीचा डेरवण रुग्णालयात मृत्यू खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे

दापोली : वन विभाग कार्यालयाजवळील रस्ता बनला ‘तळीरामांचा अड्डा’; नागरिकांमध्ये संताप

banner 468x60

दापोली शहरातील वन विभाग कार्यालयासमोरून नवभारत छात्रालयाकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या मद्यपींच्या विळख्यात सापडला असून, या ठिकाणी उघडपणे मद्यपान सुरू असल्याने परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


सदर रस्त्यालगत ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी दोन सिमेंटची बाकडी बसवण्यात आली आहेत. मात्र, या सुविधेचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. काही समाजकंटक या बाकड्यांवर बसून सर्रास मद्यपान करत असून, मद्यप्राशनानंतर रिकाम्या बाटल्या आणि बिअर कॅन रस्त्याच्या कडेला फेकून दिल्या जातात. काही वेळा या बाटल्या रांगेत मांडून ठेवल्या जात असल्याने परिसराचे रूपांतर जणू एखाद्या ‘दारूच्या प्रदर्शन’सारखे झाले आहे.

banner 728x90


या भागात मोठ्या प्रमाणात काचेच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना अडचण निर्माण होत असून, काचांमुळे जखमी होण्याचा धोका वाढला आहे. परिसरातील स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.


याच मार्गावरून कोकण कृषी विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दररोज ये-जा करतात. मद्यपींचा वावर, त्यांचे अश्लील वर्तन आणि असभ्य भाषा यामुळे विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी या मार्गाने जाणे टाळण्यास सुरुवात केली असल्याचेही समोर आले आहे.


ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेल्या बाकड्यांवर आता बसणेही कठीण झाले आहे. मद्यपींचा सततचा वावर आणि अस्वच्छता यामुळे त्यांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.
या गंभीर प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासन आणि पोलीस विभागाने तातडीने लक्ष देऊन पुढील उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *