Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

मुंबईत “कुणबी एल्गार मोर्चा” — ओबीसी आरक्षण बचावासाठी एल्गार

banner 468x60

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि कुणबी समाजाच्या हक्कासाठी “कुणबी एल्गार मोर्चा” काढण्यात येणार आहे. या मोर्च्याचे आयोजन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले असून तालुका वसई शाखेचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

हा मोर्चा ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदान, मुंबई (CSMT) येथे होणार असून, संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो कुणबी बांधव उपस्थित राहणार आहेत.

मोर्च्याचे उद्दिष्ट ओबीसी आरक्षण टिकविणे, समाजातील मागासवर्गीयांना न्याय मिळवून देणे, आणि शासनाने घेतलेल्या निर्णयांविरोधात संघटित आवाज उठविणे हे आहे.

“आरक्षण हा आमचा घटनात्मक हक्क आहे. कुणबी समाजाला न्याय मिळावा, यासाठी आम्ही मुंबईकडे मोर्चा घेऊन जात आहोत,” असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *