दापोली : हर्णे येथून विवाहित महिला आपल्या 1 वर्षांच्या चिमुकलीसह बेपत्ता, कुटुंबीयांची नागरिकांना मदतीचे आवाहन

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे येथून एक विवाहित महिला आपल्या 1 वर्षांच्या चिमुकलीसह बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रमिका काजरे (वय ३०) या दि. १६ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, श्रमिका काजरे या कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची अवघी १ वर्षांची मुलगीदेखील होती. दुपारपासून सायंकाळपर्यंत त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांकडे चौकशी केली. मात्र त्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

महिला आणि लहान मुलगी दोघीही बेपत्ता असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. परिसरातील नागरिकांनी तसेच सामाजिक माध्यमांद्वारे माहिती प्रसारित करून त्यांचा शोध घेण्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रमिका काजरे किंवा त्यांच्या मुलीबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास अथवा त्या कोठे दिसल्यास दापोली पोलिस आणि सोनू पवार यांच्याशी ‪+91 77689 23251‬ तात्काळ संपर्क साधावा, असे कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता खात्रीशीर माहिती संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहोचवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *